मुंबई : पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यामध्ये झालेला घोळ झी २४ तासनं समोर आणल्यावर सोमवारी रात्री याप्रकरणात अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या आहेत. मॅटच्या आदेशाची अंमलबाजणी करताना मीडियाला लांब ठेवण्याच्या प्रयत्नात तब्बल १५४ जणांना पहाटेच्या अंधारात नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून घरी पाठवण्यात आलं.


३०८ नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅटच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षकपदावर नियुक्ती झालेल्यांना त्यांच्या मूळपदी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण ३०८ नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पोलीस प्रबोधिनीतून 828 यशस्वी पोलीस रात्रीच्या अंधारात नाट्यमय पद्धतीनं 308 प्रशिक्षणार्थींना बाहेर काढण्यात आलं. 


झी २४ तासची होती नजर


रात्री 9 ते 11 च्या दरम्यान सरळ सेवेतून खुल्या प्रवर्गातून आलेल्या 154 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यांनतर आरक्षित गटातील 154 विद्यार्थ्याना पहाटे चार वाजता बाहेर काढण्यात आलं. हा सारा गोंधळ कॅमेरात कैद होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणांनी अंधाराचा आधार घेतला खरा...पण झी २४ तासचे प्रतिनिधी इथेही उपस्थित होते. त्यामुळे ज्यांची नियुक्ती रद्द होऊन माघारी जाण्याची वेळ आली. त्यांची नाराजी अखेर जगासमोर आलीच.