नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल विचारण्याची वेळ आलीय. जिल्हा बँकेला अंधश्रद्धेचं ग्रहण लागलंय. या बँकेच्या संचालक मंडळाने खालावलेल्या आर्थिक स्थितीसाठी आता नव्या वास्तूला दोषी धरलंय. ही जागा कधीकाळी कब्रस्तानाची असल्यामुळे इथे भुताटकी असल्याची चर्चा संचालक मंडळापासून कर्मचाऱ्यांपर्यंत आहे. त्यामुळे आता कार्यालयाची जागा सीबीएस जवळच्या नव्या इमारतीत हलवण्याचा घाट घातला जातोय. तब्बल पाच कोटी रुपयांचा फटका यामुळे बँकेला पडणार आहे. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती जिल्हा बँकेची झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सीसीटीव्ही आणि तिजोरीच्या खरेदीसाठी भुताटकीचा संदर्भ दिल्यानं नाशिक जिल्हा बँक वादात सापडलीय. बँकेची ढासळती आर्थिक परिस्थिती आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यावरून गुंतवणूकदारांनी संचालक मंडळावर टीकेची झोड उठवलीय.