नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी
दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.
नाशिक : दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.
क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झल्याने सर्व वैयक्तिक आणि मुलभूत सुविधा मिळणं कठीण झालंय. विशेष म्हणजे सुरक्षा पणाला लागली असल्याने गृह विभाग करते काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आलाय.
याचा ताण कर्मचाऱ्यांवरही पडत आहे. कारागृहासाठी १५०० कैद्यांसाठी २०१ पदे मंजूर आहेत. मात्र भरलेली पदं आहेत केवळ १९५...
आता सुमारे ३२०० कैद्यांसाठी २०० कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे सहा कैद्यांमागे एक कर्मचारी अशी अपेक्षा असताना आता पंधरासाठी एक अशी परिस्थिती आहे.