नवी मुंबई : खारघर स्टेशन परिसरात खारघर रिक्षा युनियन आणि तळोजा रिक्षा युनियन यांच्यात जोरदार हाणामारी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळोजामधील रिक्षा चालकांना खारघरमध्ये येऊन रिक्षा चालवण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालकांकडून मनाई करण्यात येते. यामुळेच हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. 


यात चार रिक्षाचालक जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारीही जखमी झालाय. यावेळी काही रिक्षावर दगडफेक करून रिक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. 


यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात दोन्ही गटा विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. या घटनेवेळी काढण्यात आलेला व्हीडिओ आता समोर आला असून यामध्ये दोन गटात झालेली हाणामारी स्पष्ट दिसतेय.