नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नवी मुंबई शहराने देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. यानंतर आता यंदा देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मात्र, या स्पर्धेत नवी मुंबईपुढे इंदोर शहराचे आव्हान आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहराने २००९ मधल्या जुलै ते सप्टेंबर कालावधीत स्वच्छतेबाबत आठवा क्रमांक पटकावला. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्या क्रमाकांवर झेप घेण्याच्यादृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. 



यासाठी शहरातील सध्याचे कचरा वर्गीकरण ८० टक्क्यांवरुन १०० टक्के करणे, गावठाण आणि झोपडपट्टी भागात डोअर टू डोअर कचरा संकलन उपक्रम राबवण्यावर भर दिला जात आहे. सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर, कचऱ्यापासून इंधन बनवण्याचा प्रकल्प सुरु करणे यावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महापालिकेचे डंम्पिंग ग्राऊंड अत्याधुनिक आहे. याठिकाणी प्लास्टिक प्रक्रिया आणि सांडपाणी प्रक्रियेचा वेगळा प्रकल्प आहे. स्थानिकांसह अनेकांनी या सुविधांचे कौतुक केले आहे.