मुंबई : Phase 1 of the Navi Mumbai metro project, from Belapur to Pendhar : नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासाला मोठा हातभार लावणाऱ्या बेलापूर ते पेंधरदरम्यान नवी मुंबईतील पहिल्या प्रकल्पाचे (Navi Mumbai metro project) काम करण्यात आले आहे. आता बेलापूर ते पेंधर मेट्रो (Belapur to Pendhar Metro) लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. कारण डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळाले आहे. (Navi Mumbai metro phase 1 gets Telecom ministry 's' dynamic clearance certificate)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 किलोमीटरच्या या मार्गावर सिडकोतर्फे 11 मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. आता बेलापूर ते पेंधर मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोसाठी केंद्रीय दुरसंचार विभागाने विद्युतीकरणविषयक डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र दिले. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठीचा एक मार्ग मोकळा झालाय, अशी माहिती सिडको जनसंपर्क विभागाने दिली.


नवी मुंबई मेट्रो एकूण 26.26 किमीचा असून चार मार्गांचा आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च सुमारे 8 हजार 904 कोटी रूपये करण्यात आला आहे. तर एकूण चार मार्गापैकी 11.10 किमी लांबीचा आणि 11 स्थानकांह 3036 कोटी रूपये खर्च आहे. सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोकरिता  केंद्रीय दूरसंचार विभाग यांच्याकडून नुकतेच विद्युतीकरणविषयक डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र  देण्यात आले आहे. यामुळे या मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. 


डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि सेफ्टी केस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पामधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. यानंतर आयएसए प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येईल. त्यापुढील टप्प्यात आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वाणिज्यिक परिचालन चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती सिडको जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.