Nawab Malik: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक आज सत्ताधारी पक्षासोबत बसणार की विरोधकांसोबत बसणार असा प्रश्न सध्या सगळीकडून विचारला जातोय. यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. नवाब मलिक यांच्यावर जे आरोप आहेत तेच आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहेत. यामुळे भाजपच्या नैतिकतेचा बुरखा फाटलाय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. दरम्यान नवाब मलिक विधानभवनात आल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले नाहीत. नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ गेले पण ते आजुबाजूलाच फिरत राहिल्याचे विधानभवन परिसरात दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नवाब मलिक यांची भूमिका हे स्वत: मांडतील अशी सावध भूमिका अजित पवार यांनी दिली. आज अधिवेशन संपेपर्यंत आपण पूर्णवेळ थांबणार असल्याचे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहेत. मलिक यांना न्यायालयाकडून माध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात येतंय. दरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिनवेशनात कालच्या म्हणजे अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकावर बसण्याला पसंती दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी काल हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली.. मात्र कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली.. तेव्हा मलिकांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल...


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत महाभारत सुरू होण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांचा सत्तेत समावेशाला उघड विरोध केलाय. महायुतीत नवाब मलिकांना घेणं योग्य होणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी पत्रातून मांडलीय. मलिकांवर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्ता येत आणि जाते. मात्र देश महत्त्वाचा आहे असं फडणवीसांनी नमूद केलंय... 


तर दुसरीकडे गिरीश महाजनांनीही नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा नकोय अशी भूमिका मांडलीय. तर शिंदे गटानंही फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट विरूद्ध अजित पवार गट असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.