गडचिरोली : गडचिरोलीत नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. एटापल्ली तालुक्यात हालेवारा मार्गावर रस्तेकाम वाहनांची जाळपोळ केलीय. दहा ट्रॅक्टर, दोन जेसीबी जाळण्यात आलेत. हे सर्व साहित्य रस्ते निर्मितीच्या कामात होते. शुक्रवारी रात्री मोठ्या संख्येने नक्षली या ठिकाणी आले. त्यांनी सर्व कामगारांना एकत्र करत बसवून ठेवले आणि या वाहनांना आग लावली. सर्व साहित्य एकूण तीन कोटी रुपये किंमतीचे असल्याची माहिती पुढे आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यात २ डिसेंबर पासून नक्षली शस्त्रसज्ज फौज असलेल्या पीएलजीएच्या स्थापना दिवसानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येतो आणि त्याची रविवारी सुरुवात होतेय. याच आठवड्यात लोहखनिज खोदकाम सुरू असलेल्या सुरजागड टेकड्यांवर नक्षली जाळपोळ करणार असल्याची अफवा उडाल्याने या क्षेत्रात काम ठप्प झाले होते. 


हालेवार गावालगत झालेल्या जाळपोळ घटनेने नक्षली पुन्हा एकदा एकत्र होत हिंसाचार माजविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झालंय.