`दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती`, म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले `जर तुम्ही असं...`
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना कवडीचीही किंमत देत नाही असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसंच गणेश चतुर्थीच्या आधीच आपलं विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असा टोलाही लगावला आहे.
दुर्देवाने अजित पवारांच्या गटाशी युती झाली आहे. पण ही युती ना त्यांना पटली, ना आम्हाला पटली. अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग असं आहे असं गणेश हाके म्हणाले. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? अशी विचारणा करताना भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केला आहे.
अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून माझे कार्यकर्तेही बोलू शकतात असा गर्भित इशारा दिला आहे. "अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. तुम्ही जर असं बोलत बसला तर तर माझेही कार्यकर्ते बोलू शकतात. या बोलण्याला मी फार अर्थ देत नाही. माझं काम चालू आहे," असं अजित पवार म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश हाके यांचं विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलं आहे. त्यांना कवडीचीही किंमत देत नाही असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या विधानानंतर महायुतीत घमासान सुरू आहे. अजित पवारांनी गर्भित इशारा दिल्यानंतर छगन भुजबळही आता आक्रमक झालेत. तिन्ही पक्षातील कारभा-यांनी या लोकांना रोखलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी आपल्याच नेत्यांना दिलाय. अशा विधानामुळे महायुतीचं नुकसान होईल आणि विरोधकांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय. तर निवडणुकीच्या तोंडावर असं विधान करणं योग्य नाही. याची जाणीव त्यांना होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सावंतांना समज द्यावी, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफांनी केली आहे.