अजित पवार-शरद पवार भेटीचं कारण आलं समोर; कोणतीही सूचना न देता थेट पोहोचले, म्हणाले, `योग्य विचार करा आणि...`
Ajit Pawar meets Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत बंड पुकारणारे अजित पवार आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवारही वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. यानंतर महाराष्ट्रात आता काही नवा भूकंप येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.
Ajit Pawar meets Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्षात बंड पुकारणारे अजित पवार इतर बंडखोर आमदारांसह आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ यांच्यासह अजित पवारही वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. यानंतर महाराष्ट्रात आता काही नवा भूकंप येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. दरम्यान शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीमागील नेमकं कारण सांगितलं.
"आमचं सर्वांचं दैवत, नेते आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ मागितली नव्हती. आम्ही सर्व अजित पवारांच्या घरी होतो, त्यावेळी आम्हाला शरद पवार बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरला आल्याची माहिती मिळाली होती. म्हणून संधी साधून आम्ही आलो होतो," अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितलं की, "शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांन आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली".
“उद्यापासून अधिवेशन सुरु होत आहे. सर्व मंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वात आपापल्या विभागाची जबाबदारी विधानसभेतही पार पाडतील," असं ते म्हणाले.