सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादीचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप कार्यकर्त्यांनी पुढच्या १५ दिवसांत घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधून त्यांना भेटवस्तू द्या अशा सूचना केल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. चंद्रकांत पाटील मतदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. 


नगरसेवकांमध्ये अस्वस्थता


सांगली महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून काँग्रेस-राष्ट्रवादीतून १८ नव्हे तर २८ नगरसेवक आले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार असल्याचं पाटील यांनी बोलून दाखवलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 


उमेदवारीचा गुंता वाढणार


दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. त्यामुळे काहीजणांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.