मुंबई : वाढत्या कोरोना केसेसमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडलाय. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला कठोर पाऊल ऊचलावी लागतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी, कामगार, व्यापारी, हमाल, कष्टकरी अशा समाजातील सर्व घटकांना झळ बसली. भाजीपाल्यासारखा नाशीवंत माल तयार करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मालाच काय होणार ? हा प्रश्न उपस्थित झालाय. या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलं पाहीजे. याला आता पर्याय राहीला नाही. 



समाजातील सर्व घटकांना विनंती आहे की, आपल्याला वास्तव नाकारुन चालणार नाही. जनतेच्या हितासाठी काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावे लागतायत. या परिस्थितीला सामोरे जाताना सुचना डोळ्यासमोर घेऊन निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय राबवण्यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. 


केंद्र सरकार राज्याला सहकार्य करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी संपर्क केला. या संकटात संपूर्ण आरोग्य खातं महाराष्ट्राच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.