पुणे : Sharad Pawar On ED : राज्याचे काही अधिकार आहेत. राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करण्यात येत आहे. विरोधकांना नमविण्यासाठी ED चा गौरवावर सुरू आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचे आहे. ईडी कुणाच्या मागे कशी लागेल, हे सांगता येत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ईडीकडून करण्यात येणारी कारवाई म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar Slams Ed Action)


RBI नव्या धोरणावर शरद पवार यांची नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवार यांनी तीव्र विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्र देऊन सहकार क्षेत्र संपवण्याचे षडयंत्र आहे, असे टीकास्त्र पवार यांनी यावेळी केले.


देशात महारष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत सहकार मोठ्या प्रमाणावर आहे. सहकाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हातात आहेत
त्यामुळे ही दोन माणसे सहकार उध्वस्त होऊ देणार नाहीत. काही निर्णय, धोरणं चुकीची असतात. ती सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार ही विचारधारा आहे. ती उध्वस्त करायचा प्रयत्न कोणी करत असेल तर आपण ती टिकवण्यासाठी सक्षमपणे उभं राहायला पाहिजे, असे पवार म्हणाले.


सहकारी बँकेच्या व्यवहारात सरकारने किती हस्तक्षेप करावा याबाबत सूत्र ठरवले गेले पाहिजे. याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सोबत देखील बोलणार आहे. सहकार क्षेत्र उध्वस्त करून चालणार नाही. ते याची काळजी घेतील, असा विश्वास आहे, असे पवार म्हणाले. 


ईडीवरुन जोरदार टोला


पवार म्हणाले, दोन-तीन वर्षांत नवीन यंत्रणा लोकांना माहीत झाली ती म्हणजे ED.  भावना गवळी यांच्या तीन ते चार  शिक्षण संस्था आहे. जिथं गैरव्यवहर झाला असेल तिथे त्याची तक्रार राज्य सरकारचा गृह खात्यात करता येते. धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करता येते. तरी ED येऊन चौकशी करते कशी? राज्याच्या अधिकारावर गदा आहे. विरोधकांना नमविण्यासाठी ED चा गौरवावर सुरू आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर चुकीचे आहे.


त्याचवेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याप्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. कायदेशीर प्रक्रियेवर भाष्य करणे योग्य नाही. इतक्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर EDच्या कारवाया ऐकल्या नव्हत्या. 



अनेक ठिकाणी नियमांचं पालन होत नाही. सरकार खबरदारी घेत आहे. म्हणून निर्बंध लावण्याची चर्चा सुरू आहे. मी यापुढे सर्व नियमांचं पालन होणार असेल त्याच कार्यक्रमाला जाणार, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


दरम्यान, यावेळी आरएसएसला टोला लगावला. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर त्यांनी भाष्य केले. चांगली गोष्ट आहे सर्व धर्म एकच समजतात. दोन्हींचा जन्म एकाच कुटुंबात झाला असे म्हणल्याचं देखील ऐकलं. माझ्या ज्ञानात भर पडली.