पुणे :  गेल्या काही दिवसांत पंतप्रधानपदासाठी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा आहे. याच विषयी शरद पवारांना सांगोल्यात विचारण्यात आलं. त्यावेळी पवारांनी गडकरींविषयी चिंता व्यक्त केली आहे.  शरद पवार यांच्या बारामतीमधील निवसस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी पुण्यात लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजपाचा कार्य़क्रम झाला. गडकरी हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतलं जात आहे, यामुळेच मी चिंतेत असल्याचे पवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


''लोकशाहीत कोणी काहीही बोलू शकतं, कोणाच्या तोंडाला आपण लगाम घालू शकत नाही. भाजपाला माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र भाजपाने लोकसभेच्या ४८ जागांची तयारी का केली नाही ?'' असा मिश्कील टोला  पवारांनी भाजपाला लगावला आहे. यावेळी भाजपा बारमती मतदार संघांत विजयी होणार अशा विश्वास मुख्यमंत्री आणि अमित शाह यांनी बोलून दाखवला होता. यावर प्रतिक्रिया देत शरद पवारांनी आपल्या शैलीत भाजपावर टीका केली आहे.



मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले, ठाकरे आज जरी काही प्रश्नावर आमच्या सोबत दिसत असले तरी ते येत्या निवडणुकीत आम्हा सोबत राहतील असे वाटत नाही. दरम्यान दोन्ही काँग्रेस व मित्रपक्ष जागा वाटपाबाबत बोलताना पवार म्हणाले, ४८ पैकी  44 जागांचे निर्णय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी ही बोलणी सुरु आहेत.