जावेद मुलाणी, झी मीडीया, बारामती : श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचं केंद्रीकरण झालं त्यामुळे असंतोष वाढला आणि जनतेचा उद्रेक झाला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sharad Pawar NCP)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचं उदाहरण देत असताना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं म्हणत त्यांनी (PM Modi) पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाकडे आपल्या बोलण्याचा मोर्चा वळवला. (Srilanka Crisis)


सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे.सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. 


नितीश कुमार, हर घर तिरंगा यांसारख्या मुद्द्यांवर वक्तव्य करताना त्यांनी शिवसेनेचं चिन्हं असणाऱ्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडेही लक्ष वेधलं. हे शिवसेनेचं चिन्ह (Shivsena) असून; यावरून वाद करणे योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 


'धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचx चिन्ह काढून घेणं योग्य नाही', असं म्हणत शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात असंही म्हटलं. 


आपण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळा पक्ष काढला, त्यावेळी चिन्हं घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही असं उदाहरण देत नको तो वाद वाढवणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचेच कान टवकारले. 


पत्रकारांशी संवाद साधतेवेळी शिंदे- फडणवीस सरकारच्या कॅबिनेट घोषणेनंतर (Maharashtra Cabinate Expansion) संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रीपदावरून बराच वाद झाला. पण, त्यासंबंधीच्या प्रश्नावर पवारांनी मात्र मौन बाळगण्यास पसंती दिली.