नागपूर : सरकार विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल मोर्चातून नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. 


झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हल्लाबोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सरकारवर हल्लाबोल करून त्यांना जागं करावं लागेल. प्रचारसाठी पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर भाजप सरकार करत आहे. आज देशात वेगळे चित्र बघायला मिळते आहे. आज देशात शेतकरी, तरुणांचे प्रश्न आहेत, मात्र देश दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगात कुणी शंका घऊ शकत नाही. पण त्याच्यावर आरोप केले गेले पाकिस्तानशी संगनमत केल्याचा आरोप करताना लाज वाटली पाहिजे. देशाची परंपरा धुळीस मिळवण्याचे काम सुरू आहे.  


लोकांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दा


लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे आणि लोकांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करायचा, साडेतीन वर्षापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आम्ही २००७ साली १५ दिवसात कर्जमाफी केली. गेली सहा महिने देवेंद्र फडणवीस सांगतायत आम्ही कर्जमाफी देणार आहोत. पण कधी देणार? आता सरकारचे कोणतेही देणे देणार नाही, वीजेचे बिल देणार नाही असा निर्धार आपण केला पाहिजे. 


सरकारची सक्तीची वसुली 


शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि हे सरकार सक्तीची वसुली करत आहे. या सरकारने आमच्या शेतमालाला भाव दिला नाही, शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे तुम्ही निर्धार करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही काय केले. मनमोहन सिंग याच्या काळात आणि मी कृषी मंत्री असताना या देशात सगळ्यात जास्त अन्नधान्य उत्पादन झाले, त्याची दखल जागतिक संस्थानी घेतली. मुख्यमंत्री दमदाटी करून सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत. ही जनता तुमची सत्ता उलथवून टाकेल.