राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना `आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड`
या आंदोलनामधे प्रतिकात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.
मुंबई : राज्यात भाजप सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी, सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत; असा आरोप करत कोल्हापूर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अभिनव आंदोलन केल. या आंदोलनामधे प्रतिकात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.
वेगळं आंदोलन
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मांडव घालून, सुगम संगीत लावून एका सन्मान सोहळ्यासारख वातावरण आंदोलकांतर्फे निर्माण करण्यात आलं होतं. आंदोलनाच्या सुरुवातील प्रतिकात्मक मुख्यमंत्र्याच ताफा आंदोलन स्थळी आला; त्यानंतर रास्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी करत मुख्यमंत्री यांच स्वागत केल.. राज्यातील सरकार सर्वसामान्य लोकांच नसून, व्यापारी हित जोपासणार आहे; असा आरोप देखील या वेळी करण्यात आला.