चंद्रकांत पाटीलांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- अजित पवार
पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
नांदेड : चंद्रकांत पाटीलांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
राज्याची अस्मिता पाळावी
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी महसूल मंत्री चंद्रकात पाटलांवर निशाणा साधला आहे.
'आपल्या मंत्र्याने परराज्यात जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी,' असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
महसूल मंत्र्यांनी बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गौरव गीत गायले होते. यानंतर वादंग पेटला होता. विरोधकांनी या प्रकरणी चंद्रकांच पाटलांना धारेवर धरले.