पुणे : चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे. त्यांच्या स्वभावाला औषध नाही. ते बोलले की मिडीयाला खाद्य मिळत असल्याची अशी बोचरी टीका राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या गुरुजन गौरव पुरस्कारावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी लेखक डॉ.अनिल अवचट आणि लेफ्टनंट जनरल  दत्तात्रेय शेकटकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना गुरुजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२४ च्या निवडणुकीला संपूर्ण बारामतीदेखील आमच्याकडे असेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते रात्रीचे मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचा गौप्यस्फोटही चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला होता. 



आमच्या विद्यार्थी दशेत शाळेतील मुख्याध्यापक-शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांची नावे माहिती असायची मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुगल हाच आपला गुरु असं विद्यार्थ्यांना वाटेल अशी परिस्थिती आहे. असे असले तरीही गुगल नेहमी योग्य मार्गच दाखवेल असं नाही. गुगल गुरु केव्हाच खऱ्या गुरुवर मात करु शकणार नाही असेही ते म्हणाले.