NCP amol Kolhe: नारायणगावला एक वघ लिहिणारे तात्या आहेत. त्यांच्यात झालेला संवाद अमोल कोल्हेंनी सांगितला. सध्या राजकारणाच रामायण झालंय, असे तात्या म्हणाले. सितामाईचे हरणं झालं तेव्हा कांचनमृग होत. त्याच्यामागे राम लागला होता. आता कांचनमृगाच रुपड पदललंय. त्याला 50 खोक्यांच जॅकेट घालतो. त्याच्या पोटात ईडी सीबीआयची कस्तुरी त्या कांचनमृगाकडे असल्याचे कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामायणात सितेचे हरण झालं होतं पण आता महाराष्ट्रात पक्ष आणि चिन्हाचे हरण झाले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे हरण झाले आहे. वानरसेना सर्वसामान्य वाटत होती. त्यांच्याकडे शस्त्र, हत्यारं नव्हती. आता कलियुगात तशी सर्वसामान्य जनता आहे. तसेच सर्वसामान्य प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्या उभा राहिल तेव्हा हनुमान उडी असेल. यामुळे कलियुगातील रामायण बदलेल, असे ते म्हणाले. रामायणात दगडावर श्रीराम लिहिल आणि दगड तरंगायला लागले. तसे डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले आणि जनतेला अधिकार मिळाले. 


राम मंदिर होतंय ही आनंदाची गोष्ट त्याच्या निमंत्रणाची वाट कशाला पहायची? कर्माला भक्ती मानणाऱ्या संत शिरोमणींना भेटायला पांडुरंग आले, असे डॉ. कोल्हे म्हणाले. 


भाजपच्या खासदारांना सर्वच निर्णय मान्य नसतात. खासगीत बोलतात ते सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे नाही, असेही ते म्हणाले. शेवटच्या रांगेत असलेल्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळेल, असे ते म्हणाले. 


राष्ट्रवादीचा विजय हे टार्गेट नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभीमान हे टार्गेट आहे.  ही लढाई कोणाची वैयक्तिक नाही तर स्वाभीमानाची असल्याचे ते म्हणाले. तत्वांसाठी लढायचंय असं मातृत्व आपल्याला हवंय, असेही ते म्हणाले. दुर्गेच रुप तुम्हाला धारण करावं लागेल असे ते म्हणाले.