मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे- जितेंद्र आव्हाड
मोदीमुक्त भारत या राज ठाकरेंनी दिलेल्या नव्या नाऱ्यावर, `देर आए दुरुस्त आए` अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलीय.
मुंबई : मोदीमुक्त भारत या राज ठाकरेंनी दिलेल्या नव्या नाऱ्यावर, 'देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलीय. महाराष्ट्रात मराठी बोर्ड असले पाहिजे , मातृभाषेचा सन्मान असला झाला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलयं.
राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा
मराठीत पाट्या असल्या पाहिजेत, या राज ठाकरेंच्या भूमिकेला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाय.
महाराष्ट्रात मराठी पाट्या असल्या पाहिजेत, मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलंय. त्याचवेळी शिवसेनेवर राष्ट्रवादीनं टीका केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रात्री शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींना केवळ गुजरातचीच काळजी असल्याचे ते म्हणाले.
मोदीमुक्त भारताची गरज
भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अश्वासनांवर विश्वास ठेऊन लोकांनी यांना मतं दिली. यांनी भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे अवाहन केले. लोकांनीही यांच्यावर विश्वास ठेवला. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची धोरणे पाहता आता मोदीमुक्त भारताची गरज निर्माण झाली आहे. हे दिसतं तितकं साध सोप प्रकरण नाही.