पुणे : शेतातील ढेकळांनी हिमालयाची तुलना करू नये अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केलीय.चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभुमीवर पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कोल्हे बोलत होते. पुण्यात राष्ट्रवादीची पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे यांसह राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वर्षापूर्वी आपल्या विचाराच सरकार आलं पण सभेच्या निमित्ताने बोलता आलं नाही. उमेदवार उभा करतांना काहींनी चावटपणा केला. मुद्दाम आपल्या अरुण लाड यांच्या नावासारखा उमेदवार उभा केल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितले. महाविकासआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची शिकस्त करणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले. 


उद्याची निवडणूक फक्त डोळ्यासमोर ठेवायची नाही. पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. पुढे सहकार, मार्केट कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत. अर्थ सारखं महत्वाचे खातं माझ्याकडे आहे. कोरोनाच्या संकटामुळे विकासकांनाना खीळ बसली. चक्र फिरायला पाहिजे ती फिरत नसल्याचे अजित पवार म्हणाले.



दिवाळीत प्रचंड गर्दी होती. कोरोना चेंगरून गेला की काय असं वाटत होतं. दुसरी लाट येणार आहे. कोरोनाचा मी अनुभव घेतला, कुणी भेटायला सुद्धा येत नाही. कोरोनापुढे जगाने हात टेकल्याचे पवार म्हणाले. 


लस आली.. लस आली असे लोकं म्हणतायतय अरे बाबा कधी आली... अजूनही लस आलेली नाही असे अजित पवार आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले.