COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याशी असलेले सगळे मतभेद संपल्याचंही पटेल यांनी म्हटलंय. नाना पटोले हे आपल्याला लहान भावासारखे आहेत आणि आगामी काळात सोबत मिळून काम करु, असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी करेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


दरम्यान राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिलीत बैठक झाली आहे. राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेची पोटनिवडणूक कॉग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.