पुणे : देशाचे प्रधानमंत्री शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पुण्याला येत आहेत. कदाचित ते आपले कौतुक करायला येणार असतील, मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढतेअसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? असेही त्या पुढे म्हणाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे प्रधानमंत्री जरी वेगळ्या विचाराचे असतील तरीदेखील त्यांना आपलं पुणे हवहवस वाटतंय असा टोला देखील आपल्या भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय.


पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेसह त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर ती भाष्य केलेय.



लोकं सारख म्हणतात हे सरकार पडणारच हे ऐकताना मला गमंत वाटते असे म्हणत 'जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात' अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. त्याच्यामुळे भांड्यांनी आवाज करायचा पाहिजे तितका करा आणि सरकार पडलं तर बघु काय करायच ते ! असे त्या म्हणाल्या. 


आज आमची टर्म आहे. कधीतरी त्यांची येईल असे म्हणत हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार असल्याचे स्पष्ट केलेय.