मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात दोन धक्के बसले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत दाखल होतील. तर भास्कर जाधव हे १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भास्कर जाधव हे गुहागर विधानसभेचे आमदार आहेत. या मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. २००४ साली भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली होती. पण आता पुन्हा ते स्वगृही परतणार आहेत. भास्कर जाधव यांच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठकाही झाल्या होत्या. झी २४ तासने भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतचं वृत्ते काही महिन्यांपूर्वीच दिलं होतं. या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.


भास्कर जाधव हे सोमवारी याबाबत भूमिका मांडणार आहेत. भास्कर जाधव यांच्यासोबत गुहागरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचेच श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे हे उद्या हातात शिवबंधन बांधतील. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.