राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीची मोठी कारवाई
NCP Junior minister Prajakt Tanpure property confiscated from ED : ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच आहे. आता आणखी एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर / अहमदनगर : NCP Junior minister Prajakt Tanpure property confiscated from ED : ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच आहे. आता आणखी एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ( Ram Ganesh Gadkari SSK) मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. (NCP minister Prajakta Tanpure in trouble, property confiscated from ED)
नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ती जमीन जप्त केली आहे. त्याशिवाय अहमदनगरमधील (Ahmednagar) साडेचार एकर जमीन जप्त केली आहे. त्या जागेची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. एकूण 13.41 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रींगप्रकरणी (money laundering) ईडीने (ED) अटक केली. त्यांना तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच याआधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तसेच खडसे यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात येत आहे.