पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची (CoronaVirus) लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चार दिवसांत बरे  होऊन ते पुन्हा मतदारसंघांमध्ये फिरू लागले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने, पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने, तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर काल रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे (Pandharpur - Mangalvedha Assembly constituency) भारत भालके हे प्रतिनिधीत्व करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांचे निधन झाले. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती.


भारत भालके यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.  त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. त्याचे वय ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भालके यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.