Narahari Ziraval : काही दिवसांपूर्वी राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान, विधानसभेचे (Vidhan Sabha) उपाध्यक्ष आणि दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची फारच चर्चा होती. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. मात्र नरहरी झिरवळ यांनी स्वत: ही चर्चा फेटाळून लावली होती. झिरवळ हे कुठंही गेलेले नव्हते आणि ते नाशिक (Nashik News) शहरात होते. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या सकाळी झिरवाळ हे मिसळीवर ताव मारताना दिसून आले होते. अशा जमिनीवरील आमदाराची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय. त्याला कारण आहे नरहरी झिरवाळ यांचा पत्नीसोबतचा दमदार डान्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक लग्न समारंभात चक्क आपल्या पत्नीला खांद्यावर घेत पारंपारिक नृत्य केले. झिरवाळ यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे त्यांच्या बोलण्याची शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या याच स्वभावाचे कौतुक देखील होते. मात्र आता पत्नीसोबतचा नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भाचीच्या हळदी समारंभात ठेका धरल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी संबळ वाद्यावर नरहरी झिरवाळ यांनी पारंपारिक पद्धतीत ठेका धरला. मात्र यासर्वांपेक्षा नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन केलेल्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे. या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



जपान दौऱ्यातही मराठमोळा पेहराव


नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यात वनारे हे त्यांचे गाव असून ते आदिवासी बहुल भागात आहे. काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांनी त्यांच्या पत्नीसोबत जपानचा दौरा केला होता. त्यावेळी झिरवाळ हे पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात होते. तर त्यांची पत्नी नऊवारी साडी, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून जपानला गेल्या होत्या. त्यांच्या जपानवारीचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या साधेपणाचे साऱ्यांनीच कौतुक केले होते.


दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांना ओळखले जाते. जनता दलातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास त्यांनी आतापर्यंत केला आहे. 2004, 2014 आणि 2019 असे तीनवेळा नरहळी झिरवाळ हे विधानसभेवर निवडणून गेले आहेत.