मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय कमी वेळातच आपली वेगळी छाप सोडणाऱ्या आणि तळागाळातील घटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या रोहित पवार यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्तानं सर्वच माध्यमांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. कर्जत जामखेड मतदार संघापासून ते अगदी राजकीय वर्तुळातील दिग्गजांपर्यंत प्रत्येकानंच या नवख्या पण तितक्याच मुरलेल्या नेत्याला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रत्येकाचे आभार मानत रोहित पवार यांनीही आपली जबाबदारी निभावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यांचा वाढदिवस आणखी खास असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या त्यांच्या पत्नीचाही वाढदिवस एकाच दिवशी. हेच औचित्य साधत सहसा खासगी जीवनाविषयी फार न बोलणाळ्या रोहित पवार यांनी पत्नीसाठी एक खास आणि तितकीच सुरेख अशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नीप्रती एक इच्छाही व्यक्त केली आहे. 


'प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंती हिचाही आज वाढदिवस आहे. सौं.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, व मेणबत्ती न विझवता आपल्या संस्कृतीनुसार लावलेल्या या दिव्याप्रमाणे तिचं आयुष्य उजळत रहावं व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना!' असं कॅप्शन लिहित त्यांनी पत्नीसोबतचा फोटोही पोस्ट केला. सहचारिणीनं कायम आनंदातच रहावं अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांच्या या शुभेच्छा पत्नीसाठी अतिशय खास असणार यात शंका नाही. 


दरम्यान, कुंतीसोबतचं रोहित पवार यांचं नातं अतिशय खास. ते शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आपल्या पत्नीला तिच्या भूमिकेसाठीचं श्रेय अगदी न विसरता देतात. मुख्य म्हणजे रोहित पवार यांच्या आणि कुंतीच्या या नात्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही महत्त्वाचं स्थान. 


 


खासगी आयुष्याबद्दल सांगावं, तर पुण्यातील बिल्डर सतीश मगर यांची मुलगी 'कुंती' या त्यांच्या पत्नी आहेत. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केली आहे.