बारामती : पवार कधी कोणाला कळले नाहीत आणि कळणारही  नाहीत, एकत्रित काम करणं म्हणजेच पवार आणि ते शेवटपर्यंत करतील असं विधान केलंय रोहित पवार यांनी औरंगाबादमध्ये केलंय. बारामतीत अजित पवारांच्या सत्काराला सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची अनुपस्थिती होती. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये काही बिनसलंय का ? या चर्चांना सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. रिकाम्या लोकांना काही कामं नसतात तेच अशा पद्धतीनं चर्चा करतात असा टोलाही चर्चा करणाऱ्यांना त्यांनी लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बारामतीमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने बारामतीकरांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे अनुपस्थित होते.


त्यामुळे उलटसुलट प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार नाराज आहेत का ? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.


पण यावेळी सावध भूमिका घेत त्यांनी तो प्रश्न झटकून टाकला. आमच्यात सर्व सुरळीत चालले असून उगीच शंका उपस्थित करु नका. ते बारामतीकरांनाही आवडणार नाही असे अजित पवार म्हणाले.