Maharashtra Politics:  नेहमी एकमेकांवर टीका करणारे महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांनी एकत्र एकाच कार मधून प्रवास केला. फक्त प्रवासातच नाही तर कार्यक्रमातही दोघे एकाच मंचावर दिसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) पुण्यात(Pune) एकत्र दिसले. राजकारणात हे असंच होत असतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे(Maharashtra Politics).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघा दिग्गज नेत्यांनी एकाच कारमधून प्रवासही केला. डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमानिमित्त पवार, फडणवीसांनी एकत्रित उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विविध विषयांवर ते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. 


शरद पवार देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून कार्यक्रमासाठी पोहोचले. त्यांनी एकत्र कॅम्पस परिसरात फेरफटकाही मारला आणि कार्यक्रमासाठी एकाच मंचावर विराजमान झाले. याचदरम्यान विश्वजीत कदम यांनी फडणवीसांना वाकून नमस्कारही केला. राजकीय वैर विसरुन हे सगळे नेते आजच्या दिवशी एकत्र पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 


यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. अदर पुनावालांना हा पुरस्कार देणं हे अतिशय आनंदाचं आहे, कोरोनाकाळात जगाला त्यांनी भारताची ताकद दाखवून दिली अशा शब्दात फडणवीसांनी अदर पुनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूटचं कौतुक केले.


2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य


दरम्यान, आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असं शरद  पवारांनी म्हटले.  2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत असं पवार म्हणाले. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरू आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.