यवतमाळ : केंद्र आणि राज्यातील सरकार हे खोटारडं असून शेतक-यांसह सर्वसामान्यांची फसवाफसवी या सरकारने चालवली आहे. खोटं बोल पण रेटून बोल एवढाच उद्योग या सरकारनं चालवल्याचा घणघात खासदार सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 


यवतमाळमधून आज मोर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज यवतमाळमधून हल्लाबोल मोर्चा सुरू होणार आहे. ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा धडक देईल. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कर्जमाफी योजना म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.


राजीनाम्याची मागणी


यात अधिका-यांचे बळी घेण्यापेक्षा ज्यांनी निर्णय घेतला त्यांनी पदापासून दूर हटत राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आज यवतमाळमधून निघणा-या मोर्चात सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते सहभागी होणार आहेत.