कोल्हापूर : राज्यातलं सरकार बळीराजाच्या जीवावर उठल्याचा आरोप आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. कोल्हापुरात दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली. यानिमित्तानं मूरगुममध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.


मोदी सरकारवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभेत बोलताना विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही मोदी सरकार आल्यापासून रोजच एप्रिल फूल डे असतो अशी खोचक टीका केली. दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात अजित पवार, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अंबाबाईच्या दर्शनानं केली. यावेळी बळीचं राज्य येवू दे, इ़डा पिडा टळू दे अशी प्रार्थना या नेत्यांनी केली.



भाजप-शिवसेना सरकारवरही टीका


भाजप-शिवसेना सरकारच्या साडेतीन वर्षाच्या कामकाजाच्या विरोधात आजपासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी  पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन होतंय. त्याची सुरूवात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अंबाबाईच्या दर्शनानं केली. या आंदोलनाच्या निमित्ताने कोल्हापूर आणि मुरगुड येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आल्या होत्या.


पाहा काय केली टीका