नागपूर: परराज्यातून आलेल्या दूधवर कर लावण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.   राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध कोंडीवर आज (मंगळवार, १७ जुलै) विधानपरिषदेत चर्चा झाली. त्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या.


विधिमंडळात दूधावर चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले दोन दिवस राज्यातील दूध संकलन जवळपास थांबलंय. राजू शेट्टींनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतोय. विधानपरिषदेतील विरोधीरपक्ष नेते धनंजय मुंडेंनी चर्चेला सुरूवात करतानाच सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ढुंकूनही बघत नसल्याचं सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय दूध भुकटीचं अनुदान पुढचे सहा महिने लागू ठेवावं अशी मागणी केली.


चर्चा करून तोडगा काढू


दरम्यान, विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.