वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: नीट घोटाळ्यातील मुख्य आरोपी ईरण्णा कोंगलवार हा मागील अनेक दिवसांपासून एटीएस, सीबीआय आणि पोलिसांना गुंजारा देत आहे. त्यामुळे ईरण्णाच्या मागे आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 'डॉन को पकडना मुश्किलही नही नामुनकीन है' असा अमिताभ बच्चन यांच्या डॉयलॉगलचा प्रत्यय ईरण्णा कोंगलवारच्या बाबतीत येतोय. कोण आहे हा ईरण्णा कोंगलवार? जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीट प्रकरणात 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या नंतरही या प्रकरणाची अद्याप पूर्णपणे पोलखोल झालेली नाही. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून या प्रकरणाचा मास्टर माईंड, अटकेतील गंगाधर नंतर ईरण्णा कोंगलवार हाच असल्याचे समोर आले. त्यामुळे नीट प्रकरणाची पाळेमुळे उकरुन काढण्यासाठी सीबीआयला हवाय ईरण्णा. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश असा वेगवेगळ्या राज्यात सीबीआय, पोलिसांची पथके ईरण्णांचा शोध घेत आहेत. तरीही ईरण्णा हाती लागत नाहीय. देशभर गाजत असलेल्या नीट प्रकरणात लातूर पोलिस सीबीआयला आवश्यक ती मदत करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयला ईरण्णाला पकडणे मुश्कील झाले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील लातूरचे आरोपी थेट ''नॅशनल टेस्टिंग एजन्सी'' (नीट) मधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यानुसार लातुरातील आरोपीच्या संपर्कात असलेला ''नॅशनल टेस्टिंग एजन्सी'' मधील 'त्या' अधिकाऱ्याच्या सीबीआय शोध घेत आहे. त्यामुळे लातुरातील आरोपींचे थेट दिल्ली कनेक्शन असल्याचे आणि नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. 


आतापर्यंत झालेल्या तपासात इराण्णाच्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी गंगाधर आणि इराण्णा यांच्यात 15 लाखांचा सौदा ठरला होता. त्यात एक लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरले होते. दोघे एकमेकांच्या 2023 पासून संपर्कात होते. नीटपेपर मध्ये अशाच पद्धतीने गुण वाढवण्यासाठी इराण्णा, गंगाधर, जाधव आणि पठाण यांनी अनेकांकडून पैसे घेतले असावेत असा अंदाज आहे. या प्रकरणातील जाधव आणि पठाण यांच्यातील महत्त्वाचा दुवा हा इराण्णा असल्याचा संशय सीबीआयला असल्यानेच त्यादृष्टीने तपास सुरु आहे. मात्र ईरण्णा हाती लागल्यानंतरच याप्रकरणाची उकल होणार आहे. त्यासाठी सीबीआयला कुठल्याही परिस्थितीत ईरण्णा हवा आहे. त्या दिशेने तपासचक्रे गतीमान करण्यात आली आहेत.


कोण आहे इरण्णा कोनगलवार ? 


मुळचा नांदड जिल्ह्यातील देगलूरचा असलेल्या इरण्णाची नोकरी धराशिव जिल्ह्यातील उमरगा आयटीआय येथे होती. 


लातुरातील उच्चभृ वस्तीत इरण्णा आपल्या कुठूम्बा सह रहात होता . 


इरण्णाची पत्नी लातुरातील खासगी शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी करते. 


एटीएसने जलील पठाणला ताब्यात घेतल्यानंतर इरण्णा कुटुंबासह फरार झाला . 


इरण्णाच्या मुलीने नीटची परीक्षा दिली होती. मात्र तिला यश आले नाही , त्यामुळे इरण्णा गंगाधरच्या संपर्कत आला . 


हैदराबादला इरण्णा आणि गंगाधरची भेट झाली. तिथून इरण्णाने महाराष्ट्रात एजंटचे जाळे विनले . 


इरण्णाने नेमके किती एजंट निर्माण केले? याची उकल होण्यासाठी इरण्णा सीबीआईसाठी महत्वाचा ठरलाय.