रायगड : नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची शटल सेवा सध्या अमन लॉज ते माथेरानच्या दरम्यान सुरू आहे. या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून फेऱ्या वाढणार आहेत. सध्या या मार्गावर दहा फेऱ्या आहेत. मात्र या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. जानेवारी २०१६ ते मे २०१६ मध्ये माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये दोन घटना तर रुळावरुन डबे घसरण्याच्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मे २०१६ पासून मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन सुरु करण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने, पर्यटक आणि स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 


२६ जानेवारीपासून नेरळ ते माथेरान सेवा देखील सुरू


अखेर सुरक्षेची सर्व पूर्तता केल्यानंतर प्रथन अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू केली. त्यानंतर २६ जानेवारीपासून नेरळ ते माथेरान सेवा देखील सुरू झाली असून या मार्गावर प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्याकडून सांगण्यात आले.