कोल्हापूर : मराठा आरक्षणावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्याआधी आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारची मागणी होती, त्यानुसार पाच खंडपीठाकडे केस गेलेली आहे. आज त्याची सुनावणी आहे, त्यामध्ये सरकारचे वकील योग्य भूमिका मांडतील असा विश्वास आहे.' असं संभाजीराजे यानी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या चुका सरकारने दुरुस्त केल्या आहेत, चांगलं कॉर्डिनेशन झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता, ते स्वत:  मराठा समाजाची समिती, मंत्री यांच्याशी बोलले आहेत. मुकुल रोहतगी आणि इतर वकील जोरात बाजू मांडतील असा विश्वास आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


मला आश्चर्य वाटतंय, मराठा समाजाने SEBC मधून आरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे. ओबीसी मधून आरक्षण काढून द्या असं कधीच म्हणालो नाही, मग त्याबद्दल चर्चा कशाला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 


'मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना आणि लोकांना माझी विनंती आहे, यावर चर्चाच नको.' असं देखील आवाहन त्यांनी केलं आहे.