नाशिक : स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त आढळला आहे. या घटनेमुळे नाशिकात एकच खळबळ उडाली आहे. परदेशात सध्या नव्या कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला आहे. अशातच परदेशातून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा विषाणू नव्या कोरोनाचा तर नाही ना अशी शंका वर्तवली जात आहे. यामुळे या घटनेचं गांभीर्य सर्वाधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ डिसेंबरला हा तरूण स्कॉटलंडहून भारतात आला होता. २६ डिसेंबरला या तरूणाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी स्वॅब रवाना करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे परदेशातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घालण्यात आली आहे. ही विमान सेवा आता बंद आहे.


स्कॉटलंडहुन आलेला युवक १३ डिसेंबर रोजी भारतात आला होता. ८ दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर या तरूणाची आई २४ डिसेंबर कोरोना पोझिटीव्ह  आली आहे. २६ डिसेंबर रोजी मुलगाही  कोरोना पोझिटीव्ह आला. कुटुंबात परदेश दौऱ्याची माहिती असल्यामुळे या दोघांना नवीन व्हायरस असल्याची भीती वर्तवली जात आहे. 



युवकाच्या  स्वॅबचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसांत या रिपोर्टचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तसेच या तरूणाच्या संपर्कात आलेल्यांची देखील कोरोना तपासणी होणार आहे.