माळीण :  चार वर्षापूर्वी घडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले खरे पण पहिल्या पावसातच या नव्याने वसविण्यात आलेल्या माळीण गावातील घरांना तडे पडले असून अनेक ठिकाणी रस्ते आणि जमीन खचली आहेत. 
  
 चार वर्षांपूर्वी माळीणची घटना संपूर्ण देशाला चटका लावून गेली. गेली तीन वर्षे येथील नागरिकांना असेल त्या परिस्थितीत वनवास काढला. अखेर स्मार्ट विजन म्हणून सहा महिन्यापुर्वी माळिण गाव स्थापित करण्यात आले. या व्हिलेजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करून माळिण वासियांना घरे देण्यात आली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आता काल पासुन सुरु झालेल्या पहिल्याच पावसात घरे रस्ते यांना भेगा पडायला सुरुवात झाली आहे. या परिसरात गेल्या २४ तासात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने यासाठी या स्मार्ट व्हिलेज मध्ये कुठल्याही उपाययोजना केल्याने नसून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशीही शंका येत आहे. 



हा पाऊस असाच सुरु राहिला तर नवीन माळीणला पुन्हा धोका होऊ शकतो अशी परिस्थिती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे नागरिकांनी यापूर्वी तात्पुरते उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आपला संसार हलविला आहे.