सटाणा : भारनियमाचा अनेक छोट्या व्यवसायिकांवर परिणाम होतो. भारनियमनामध्ये आपल्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये म्हणून सटाण्यातील मनोज पगारे या सलून चालकानं नामी शक्कल लढवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज खंडीत झाल्यावर तो चक्क डोक्याला टॉर्च बांधून दाढी-कटिंग करतो. सटाणा शहरात आठ ते नऊ तासांचं भारनियमन असल्यानं अनेक छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायवरच कु-हाड पडण्याची वेळ आलीय. 


सायंकाळी होणाऱ्या भारनियमनाचा मनोज पगारे यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागलाय. यामुळे आपल्या व्यवसाय वाचवण्यासाठी पगारे यांनी ही शक्कल लढवलीय. पगारे यांचे टॉर्च बांधून दाढी करण्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत असून परिसरात सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय.