हिंगोली : आता बातमी थकीत कर वसुलीच्या (tax recovery) नव्या फंड्याची. हिंगोली (Hingoli) शहरातील चौकाचौकात सध्या विशिष्ट प्रकारचे फ्लेक्स (Flex) लावण्यात आले आहे. या फ्लेक्सची सध्या चांगलीच चर्चा आहे. तसेच कोणी कोणी कर थकवलेत, याचीही चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे हिंगोली नगरपालिकेचा ( Hingoli municipal) हा नवा फंडा वसुली करण्यात यशस्वी होणार का, याकडे लक्ष लागले आहे. (New tricks for Hingoli municipal tax recovery)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोली नगरपालिकेची गेल्या वीस वर्षांपासून ज्यांनी पाणी पट्टी, घरपट्टी भरलेलीच नाही, अशा 80 थकबाकीदारांची नावं या फ्लेक्सवर छापण्यात आली आहे. जे लोक कर भरणार नाही त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.


यापूर्वी थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात छापून आणली होती. मात्र त्याचा योग्य तो रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे पालिकेने थकबाकीदारांची यादी थेट पोस्टवरच छापली आहेत. कर वसुलीच्या या नव्या फंड्याचा परिणाम असा होतोय की यादीमध्ये नावे असलेल्या थकबाकीदारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  


नगरपालिका जादा कर लावत आहे, त्याचसोबत बॅनरबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची बदनामी करत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.