महाराष्ट्रात ४७ वेळा कोरोना व्हायरसने बदलला रंग, तिसरी लाट असणार घातक
महाराष्ट्रातील या भागात कोरोनाचा धोका अधिक
मुंबई : कोरोना व्हायरसच्या म्युटेशनबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना व्हायरसने तब्बल 47 वेळा आपला रंग बदलला आहे. इतर राज्यांमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ही अतिशय घातक असेल. कारण कोरोना व्हायरसच म्युटेशन झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्रात याबाबत संशोधन केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात नागरिकांमध्ये नवनवे वेरिएंट असल्याचे उघडकीस झाले. या दरम्यान प्लाझ्मा, रेमडेसिविर आणि स्टेरॉयडयुक्त औषधांचा अति वापर केल्यामुळे म्युटेशनमध्ये वाढ झाली आहे. यामुळे इतर राज्यातही सिक्वेसिंग वाढवण्याची गरज आहे.
पुण्याताली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी (एनआयवी), भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि नवी दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) यांच्या संयुक्त संशोधानात महाराष्ट्राचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमणाचा धोका गेल्या 1 वर्षात महाराष्ट्रालाच झाला आहे. एनआयवीमधून डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितले की, गेल्या फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या एस प्रोटीनमध्ये सर्वाधिक म्युटेशन पाहायला मिळाले. आता एक एका म्युटेशनबाबत माहिती जमा केली जात आहे.
यातील अनेक म्युटेशनबाबत अगोदरच माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार, म्युटेशनमध्ये होत असलेल्या बदलामुळे मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनसीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.617 वेरिएंट आतापर्यंत 54 देशात सापडलं आहे. यातील एका म्युटेशनला डेल्टा वेरिएंट असं नाव WHO ने दिलं आहे.
अभ्यासात काय म्हटलंय?
यावर्षात कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाचं संक्रमण वाढलं. नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत 733 नमुने एकत्र करण्यात आले. यांच्या अध्ययनावर हा अभ्यास अवलंबून आलं आहे. या सगळ्या नमुन्यांमध्ये 47 वेळा व्हायरसचे म्युटेशन अनुभवण्यात आले.
महाराष्ट्रातील या भागात कोरोनाचा धोका अधिक
या अभ्यासात समोर आलं आहे की, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा धोका आहे. या अगोदर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बी.1.617 कोरोना व्हायरसचे रूग्ण अधिक पाहायला मिळाले. पुणे, ठाणे, औरंगाबादसह पश्चिम राज्यात डेल्टा वेरिएंटमध्ये वेगवेगळे म्युटेशन पाहायला मिळेल.