New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देताना पार्टी (year end party) वगैरे बाजुला सारत अनेकजण देवदर्शनाला जाण्याचा निर्णय घेतात. सरतं वर्ष मागे ठेवलत नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेकजण आपल्या आराध्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यासाठी जातात. तुम्हीही 2023 या नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थर्टीफर्स्ट (Thirty First party) आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मंदिरंही सज्ज झाली आहेत. अनेकांची श्रद्धा असणाऱ्या शिर्डीचं (Shirdi) साई मंदिर प्रशासनानं ३१ डिसेंबरला म्हणजेच आज मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,  तर (Shegaon) शेगावचं गजानन महाराज मंदिरही आज रात्रभर खुलं राहणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई (Kolhapur ambabai mandir) मंदिरात नेहमीप्रमाणे पावणे पाच ते रात्री पावणे दहापर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल. तर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर (Mumbai Siddhivinayak temple) नव्या वर्षाच्या स्वागताला म्हणजेच १ जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून खुलं करण्यात येईल. 


मंदिरं भक्तांसाठी खुली, पण कोरोनासाठी नाही... (Maharashtra Corona Alert)


एकिकडे मंदिरांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ लागणार हे नक्की. पण, यामध्येच मंदिर प्रशासनं कोरोनाशी लढा देण्यासाठीही सज्ज असल्याचं दिसून येत आहे. (Ratnagiri) रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आलीये. (Ganpatipule temple in Ratnagiri) आजपासून कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पुजारी यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तर येणाऱ्या भाविकांनाही कोरोन नियमांचे पालन करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. तिथे (jejuri) जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिरात कर्मचारी आणि अधिका-यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. तूर्तास इथं भाविकांना मास्कसक्ती नसली तरी कोरोनाच्या नियमांचं पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?


 


(Tuljapur) तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि सदरील परिसरामध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिरकाऱ्यांनी दिलेल्या या निर्देशांचं सर्वांनी पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


(Pune Shrimant dagdusheth halwai ganpati mandir) दरम्यान पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुट्ट्यांदरम्यान होणारी गर्दी पाहता मंदीर प्रशासनानं भाविकांना मोफत मास्क वाटण्याचं पाऊल उचललं आहे.