निवडणूक केंद्रापर्यंत वाजतगाजत वरात काढत नवदाम्पत्याचं मतदान
वरात थेट पोहोचली मतदान केंद्रात...
बदलापूर : बदलापुरात एका नवदाम्पत्याने थेट निवडणूक केंद्रातच वरात मतदानाचा अधिकार बजावला. शिवाजी पवार आणि वृषाली गाडे असं या दाम्पत्याचं नाव आहे. बदलापूरजवळच्या ग्रामीण भागात असलेल्या भोई सावरे गावात हे दोघे राहतात. मतदानाच्या दिवशीच त्यांचं लग्न पार पडलं. मात्र लग्न झाल्यावर या दोघांनी थेट निवडणूक केंद्रापर्यंत वाजतगाजत वरात काढली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वऱ्हाडी मंडळीदेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.