मुंबई : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता वाहतूक पोलीस अनावश्यकपणे थांबवून तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत, विनाकारण तुमचे वाहन तपासू शकणार नाहीत. पोलीस आयुक्त (सीपी) हेमंत नगराळे यांनी यासंदर्भात एक परिपत्रक वाहतूक विभागाला जारी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिपत्रकात असे म्हटले आहे की, वाहतूक पोलीस आता कोणत्याही वाहनांची तपासणी करणार नाही, विशेषत: जेथे चेक नाका आहेत. तेथे पोलिस फक्त वाहतुकीवर लक्ष ठेवतील आणि वाहतूक सामान्यपणे चालू होईल यावर लक्ष केंद्रित करतील. यामुळे वाहतुकीच्या वेगावर काही फरक पडत असेल तरच ते थांबवतील.


किंबहुना, अनेकदा असे दिसून आले आहे की, वाहतूक पोलिस संशयाच्या आधारावर वाहने कोठेही थांबवतात आणि वाहनाच्या आतील भाग तपासू लागतात. त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो.


सीपी नगराळे यांनी वाहतूक विभागाला जारी केलेल्या या परिपत्रकात, सर्व वाहतूक पोलिसांना वाहनांची तपासणी थांबवण्यास सांगण्यात आले आहे, कारण रस्त्यावर वाहतूक जास्त असे आणि असे केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो आणि ट्राफिक वाढते. यामुळे पोलीसांना वाहतुकीच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यास प्राधान्य देण्यास सांगितले आहे.


परिपत्रकात म्हटले आहे की, जर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहतूक पोलिसांकडून शुल्क आकारले जाऊ शकते.


वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान, वाहतूक पोलिस केवळ वाहतूक उल्लंघनांवर कारवाई करतील, परंतु ते वाहने तपासणार नाहीत. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षक जबाबदार असतील.


वाहतूक पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांनी संशयाच्या आधारावर वाहनांना थांबवू नये. ते म्हणाले की, आमचे जवान पूर्वीप्रमाणेच वाहतुकीच्या गुन्ह्यांविरूद्ध चालना देत राहतील आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखतील.