नवी दिल्ली :  NIAने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याची मोठी माहिती पुढे आली आहे. तसेच 'टेरर फंडिंग'मागे ( Terror Funding) राजकीय कनेक्शन (Political connections) असल्याची धक्कादायक माहिती NIAच्या तपासासून उघड झाली आहे. डी गँगच्या दोन हस्तकांना NIAने अटक केली होती. त्यांची चौकशी केली असता काही राजकीय नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 NIAतपासात डी गँगच्या दोन हस्तकांकडे काही राजकीय नेत्यांची यादीच सापडली आहे. या यादीबाबत चौकशी करायची असल्याचे NIAने न्यायालयात सांगितले. त्यामुळे येत्या काळात काही बडे नेते यात अडकण्याची शक्यता आहे. डी गँगच्या हिटलिस्टवर काही बडे नेते आणि बडी मंडळी असल्याची माहितीही समोर आली आहे. अनेक दहशतवादी संघटनांशी दाऊद गँगचे धागेदोरे जोडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


डी गँगच्या दोन हस्तकांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते आहेत आणि त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट आहे. याबाबतही चौकशी करायची असल्याचे NIAने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात काही राजकीय नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. NIAने दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर, सरकारी वकील संदीप सदावर्ते यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये डी कंपनीचे धागेदोरे अनेक दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत.