सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बंडाचे निशाण फडकावलेलं असलं तरी मुलाबाबत त्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचं दिसतंय. राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणे हे नारायण राणेंच्या उद्याच्या पत्रकार परिषदेला हजर राहणार नाहीत. राणेंनी काँग्रेसवर टीका केल्यास नितेश राणेही अडचणीत येऊ शकतात. पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होईल या भीतीनं काँग्रेसचे विधानसभेचे आमदार नितेश राणे उद्याच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.