सिंधुदुर्ग : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांची 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी आहे.नितेश राणे यांच्या अंतरिम जामिनावर सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू  सुनावणी होणार आहे. सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार  आहे. जामीन मंजूर होणार की नाही याकडे  लक्ष  लागले आहे. तर गोट्या सावंतला 10 दिवसात शरण यायची न्यायालयाची ऑर्डर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल आमदार नितेश राणे यांची कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात तपासणी करण्यात आली. न्यायालयीन कोठडी झाल्यावर नितेश राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून काल कोल्हापूरला हलवले आहे. दरमयान, संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं संदेश तर्था गोट्या सावंत यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.  संतोष परब हल्ला प्रकरणी गोट्या सावंत हे संशयित आरोपी आहेत. गोट्या सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, तसेच आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी देखील आहेत.


आज न्यायाधीश रोटे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. काल राज्यभरातील न्यायालये बंद असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी टळली होती. आज राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.


नक्की काय आहे हे प्रकरण?  


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात सापडलेत. त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते.