नांदेड : विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल. पण, केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनीच राज्यातील स्वत:च्या भाजप सरकारवर टीका केली आहे. (व्हि़डिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पष्ट बोलणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सर्वांनाच परिचित आहेत. याचाच अनुभव आज मराठवाड्यातल्या जनतेला आला.


सूट शिवून देतो, घडयाळ आणि टोपी पण देतो, मात्र राज्यासाठी अंडर पॅन्ट आणि बनियान तरी विकत घ्या अशा शब्दात नितीन गडकरी यांनी राज्य सरकारमधल्या मंत्र्यांना चिमटा काढला.


नांदेड जिल्ह्यातल्या माहुरमध्ये विविध रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारनंही थोडाफार खर्चाचा भार उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.



तसेच रस्त्याच्या कामात कंत्राटदारांनी हलगर्जीपणा केल्यास बुलडोझरखाली देण्याचा इशाराही यावेळी नितीन गडकरी यांनी दिला.