नितीन गडकरींनी दिली भ्रष्टाचाराची माहिती
नागपुरात सुरु असलेल्या ऑरेंज फेस्टिवलच्य उदघाटनावेळी ते बोलत होते.
नागपूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांच्याच विभागाच्या योजनेच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली.
नागपुरात सुरु असलेल्या ऑरेंज फेस्टिवलच्य उदघाटनावेळी ते बोलत होते.
नोगाची वाताहत
सरकारी अधिका-यांच्या आडमुठेपणामुळे नागपूर ऑरेंज ग्रोव्हर असोसिएशन म्हणजेच नोगाची वाताहत झाल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
यावेळी बोलताना राज्य सरकार नोगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तसंच नागपुरात पहिल्यांदाच होत असलेल्या ऑरेंज फेस्टिवलला राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून पूर्ण मदत केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.